ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात घोषणाबाजी

| Updated on: Jun 25, 2022 | 4:54 PM

राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेनेचे 38 आमदार आहेत. सध्या हे सर्व आमदार आसाम गुवाहाटी येथे आहेत. दरम्यान राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आले. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचं कार्यालय फोडण्यात आलं. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थही कार्यकर्ते पुढे आले आहेत. आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कायकर्ते जमले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Published on: Jun 25, 2022 04:54 PM
Eknath Shinde : तूर्तास एकनाथ शिंदे व रामदास कदम याच्यावर कारवाई नाही
Shivsena: शिवसेनेतील बंडखोर आमदार यांना धडा शिकवू- प्रियांका चतुर्वेदी