Special Report | संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले गैरहजर अन् म्हणाले, माझ्यामुळेच इतरांची…
VIDEO | छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहिले आणि उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची काल राज्यातील पहिलीच संयुक्त सभा झाली. या सभेत ठाकरे गटाकडून स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंसह स्थानिक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंनी हजेरी लावली. पण काँग्रेसकडून स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर असल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच कसे नाहीत? यावरुन उलट सुलट चर्चा सुरु झाली. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर असल्यानं चर्चेंना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. खासदार संजय राऊतांनी पटोलेंच्या तब्येतीचं कारण सांगितलं. पण माझी तब्येत ठीक असून माझ्यामुळंच इतरांची तब्येत खराब होते, असा इशारा पटोलेंनी दिला. आता मविआची पहिलीच सभा आणि त्यात, काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष नाही म्हटल्यावर चर्चा होणं स्वाभाविक होतंच. पण त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पटोलेंची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळं पटोले आले नाहीत, असं राऊत म्हणालेत. पण राऊतांचं असं बोलणं पटोलेंना अजिबात आवडलं नाही. नाना पटोले मुंबईतच होते आणि आराम करत होते, असं संजय राऊत सांगतायत. पण आपण दिल्लीला गेलो होतो आणि राहुल गांधींच्या सुरत दौऱ्याची आखणी सुरु होती, असं पटोले सांगतायत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट