Raigad | उरणमध्ये चायनीज खाऊन 7 जणांना विषबाधा, 6 लहान मुलांचा समावेश
रस्त्यावरील चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार उरण शहरात समोर आला आहे. गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उरण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

उरणमधील एन आय हायस्कूलजवळ हे चायनीज सेंटर आहे. या चायनीज सेंटरवरुन तक्रारदाराने 5 हाफ चिकन फ्राईड राईस पार्सल नेले होते. मात्र हा राईस खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. कुटुंबातील सगळ्यांनाच उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने, अनर्थ टळला. चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चायनीज सेंटरच्या मालकावर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.