Ajit Pawar At Koyna Dam | कोयना नगर इथं नव्या विश्रामगृहाचे उद्घाटन, धरणग्रस्तांना जमिनीचं वाटप

| Updated on: May 16, 2022 | 3:57 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते कोयनानगर (Koyna) येथील शासकिय विश्रामगृहाचे उद्घाटन झालेलं तर त्यांनी कोयना धरणा प्रकल्पग्रस्तांना समारंभपुर्वक पर्यायी जमिनेचे सातबारा वाटप केले.

कराड, सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते कोयनानगर (Koyna) येथील शासकिय विश्रामगृहाचे उद्घाटन झालेलं तर त्यांनी कोयना धरणा प्रकल्पग्रस्तांना समारंभपुर्वक पर्यायी जमिनेचे सातबारा वाटप केले. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. कोयना नगर येथे कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पर्यायी जमीन वाटप करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, डॉ भारत पाटणकर हे मंचावर उपस्थित होते. 15 कोयना धरण ग्रस्तांना पर्यायी जागेच्या सातबाराचे अजित पवार यांचे हस्ते वाटप करण्यात आले. तब्बल 61 वर्षा नंतर कोयनेतील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात आला.पावसाळ्यात रस्ते वाहुन जातात कोयनेत जातीने लक्ष घालणार असुन नवीन टेक्नोलॉजी ने काम करणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले

Published on: May 16, 2022 03:57 PM
“फडणवीस साहेब, एकटे औरंगाबादमध्ये फिरून दाखवा”, इम्तियाज जलील यांचं फडणवीसांना आव्हान
राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर