Special Report | नोटा मोजण्याच्या 12 मशिन, 13 तासांनंतर काऊंटिंग संपली तब्बल 58 कोटींचे घबाड सापडले
या छापेमारीत 58 कोटींच्या नोटा, 32 किलो सोनं, हिरे आणि मोती इतर संपत्ती असं एकूण 390 कोटींचं घबाड आयकरच्या हाती लागलंय. टॅक्सच्या रकमेत मोठा हेराफेरी होत असल्याची माहिती जीएसटी विभागाकडून आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागानं खास मोहीम राबवत छापा टाकला.
जालाना : दुल्हन हम ले जायेंगे म्हणत, आयकरचे अधिकारी आले आणि स्टिल कंपन्याचा बाजार उठवून गेले. हा नोटांचा ढिग पाहा…500 च्या नोटांच्या बंडलांचा खच पडलाय. आयकरच्या अधिकाऱ्यांना या नोटा मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागलेत. त्यासाठी 12 नोटा मोजण्य़ाच्या मशिन आणाव्या लागल्या. 13 तासांनंतर तब्बल 58 कोटींचा आकडा समोर आला आणि अधिकारीही चक्रावले. आयकर विभागाचा हा छापा जालन्यात पडलाय. एसआरजे स्टिल, कालीका स्टील कंपनीवर ही धाड पडली असून मोठं घबाडचं आयकरच्या हाती लागलंय. स्टील कंपन्यांसोबतच जालन्यातील व्यावसायिक विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्यासह सुंदरलाल सावजी सहकारी बँकेवरही आयकरची छापेमारी झाली. या छापेमारीत 58 कोटींच्या नोटा, 32 किलो सोनं, हिरे आणि मोती इतर संपत्ती असं एकूण 390 कोटींचं घबाड आयकरच्या हाती लागलंय. टॅक्सच्या रकमेत मोठा हेराफेरी होत असल्याची माहिती जीएसटी विभागाकडून आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागानं खास मोहीम राबवत छापा टाकला. मात्र या छाप्या एखाद्या फिल्मी स्टाईलपेक्षा कमी नव्हता. मुंबई,ठाणे आणि नाशिकमधील 260 कर्मचाऱ्यांच्या 100 हून अधिक गाड्या जालन्यात येणार होत्या. त्यामुळं कुणकुण लागू नये म्हणून वऱ्हाडी बवून अधिकारी जालन्यात धडकले. त्यासाठी गाड्यांना सजवलं..राहुल वेड्स अंजली नावाचे पोस्टर लावले. आयकरच्या अधिकाऱ्यांनी स्टील कंपन्या आणि व्यावसायिकांचा बँड वाजवला.