Aaditya Thackeray यांचे निकटवर्तीय Rahul Kanal आयकर विभागाची छापेमारी, समर्थकांची घोषणाबाजी

| Updated on: Mar 09, 2022 | 10:11 AM

मंगळवारी सकाळी आयकर विभागाने आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल यांच्या घरी छापेमारीला सुरूवात केली. राहूल कनाल हे बांद्रा परिसरात राहतात. तिथं दिवसभर आयकर विभागाने त्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर चौकशी करत असताना कनाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigative Agencies) एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावर दिल्लीचं आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया काल आदित्य ठाकरे (Aditya Thackera) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना दिल्लीतल्या राष्ट्रीय एजन्सीकडून टार्गेट केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती सध्या धाडी टाकल्या जात असून त्याला आम्ही घाबरत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने भाजप विरूध्द शिवसेना असं वातावरण आता चांगलचं तापलं आहे. सध्या आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल (rahul kanal) यांच्या घरावर काल आयकर विभागाने छापेमारी केली. राहूल कनाल यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आयकर विभागाने टार्गेट केलं असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे.

Special Report | संजय राऊतांचे 2 टार्गेट ED आणि Kirit Somaiya -Tv9
Anil Parab यांच्या CAच्या घरी 24 तास उलटले तरी आयकर विभागाकडून छापेमारी सुरुच