अन् एसी लोकलचे प्रवाशी घामाघूम, पश्चिम रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडलं, पण का?
VIDEO | पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलंच वेळापत्रक कोलमडलं, ७ एसी लोकल रद्द, प्रवाशांची गैरसोय झाल्यानं एकच गोंधळ
मुंबई : उन्हाच्या तडाख्याने राज्यातील नागरिक हैराण झाले असताना मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईतील विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील एसी अचानक बिघडल्याने प्रवाशांचे एकच हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रवाशांच्या गोंधळामुळे वसई, भाईंदर आणि मीरा रोडला ही एसी लोकल वारंवार थांबवली जात आहे. एसी लोकल वारंवार थांबवल्याने इतर लोकलच्या वाहतुकीवर त्यांचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला इतकेच नाही तर पश्चिम रेल्वच्या ७ एसी लोकल रद्द करण्यात आल्यात. ७ गाड्या रद्द केल्याने दुपारच्या वेळीच एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
Published on: Apr 21, 2023 12:25 PM