Special Report | देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात?

| Updated on: Aug 30, 2021 | 12:12 AM

गेल्या 8 दिवसात देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात ऑगस्ट अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येईल, असं भाकित केलं होतं, ते खरं ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

गेल्या 8 दिवसात देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात ऑगस्ट अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येईल, असं भाकित केलं होतं, ते खरं ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यातील परिस्थितीदेखील बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे. राज्याच्या राजधानीत सध्या 3021 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या 7 लाख 42 हजार 763 वर पोहोचली आहे. तर, मुंबईत 15 हजार 968 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत. (Increasing corona patients is that beginning of third wave of corona in country?)

Special Report | शिवसेनेचे मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर!
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 30 August 2021