‘इंडिया आघाडी’कडून कोण होणार पंतप्रधान? संजय राऊत एका वाक्यात म्हणाले…
लोकसभा निकालापूर्वी आलेल्या टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. अशातच इंडिया आघाडीकडून कोण होणार पंतप्रधान? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला असता ते म्हणाले....
इंडिया आघाडीचं सरकार येणार असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणताय मात्र लोकसभा निकालापूर्वी आलेल्या टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. अशातच इंडिया आघाडीकडून कोण होणार पंतप्रधान? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला असता ते म्हणाले, भाजपचं ठरलं आहे का… भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाही. उद्या संध्याकाळी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ४ वाजेनंतर नरेंद्र मोदी हे भूतपूर्व झालेले असतील, असे वक्तव्य करत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नसल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला तर निकाल लागल्यानंतर २४ तासांच्या आत इंडिया आघाडीकडून पंतप्रधान निवडेल… आम्हाला काही अडचण नाही, आमच्याकडे सगळ्या विषयावर चर्चा झाल्या आहेत. आमचा निर्णय झालाय. निकाल संपल्यावर इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता हा दिल्लीत पोहोचलेला असेल आणि २४ तासात आम्ही पंतप्रधानपदाचा निर्णय घेऊ, असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी माध्यमांच्या सवालावर उत्तर दिले.