विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत वंचित सहभागी होणार? पडद्यामागं काय घडतंय?

| Updated on: Oct 06, 2023 | 12:41 PM

tv9 marathi Special Report | इंडिया आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सहभागासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं चर्चा सुरू असताना 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचा भटजी जोपर्यंत तारीख काढत नाही, तोपर्यंत बोलणी होणार नाही', प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | इंडिया आघाडीकडून वंचित आघाडीला सहभागासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरु आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इंडिया आघाडीकडून वंचित आघाडीला सहभागासाठी निमंत्रण दिलं जाईल का? या प्रश्नावर त्यांचं स्वागतच असेल. तर या निमंत्रणाबाबत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याची आमची इच्छा आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचा भटजी जोपर्यंत तारीख काढत नाही. तोपर्यंत बोलणी होणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. बघा नेमंक काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

Published on: Oct 06, 2023 12:41 PM
शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट अन् देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टाकला बॉम्ब, म्हणाले…
Kalyan रेल्वे स्थानकात अपघात, धावत्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून उतरायला गेला अन्…