World Cup 2023 Final मध्ये विराटला चेअरअप करण्यासाठी अनुष्का अहमदाबादमध्ये, बघा पहिली झलक

| Updated on: Nov 19, 2023 | 12:23 PM

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील अहमदाबाद येथे दाखल झाली आहे. त्यामुळे अनुष्का देखील तिच्या स्पेशल शुभेच्छा देण्यासाठी आणि विराटला चेअरअप करण्यासाठी दाखल झाली आहे

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील अहमदाबाद येथे दाखल झाली आहे. त्यामुळे अनुष्का देखील तिच्या स्पेशल शुभेच्छा देण्यासाठी आणि विराटला चेअरअप करताना आज स्टेडिअममध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम हा अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. तर आज होणाऱ्या सामन्यातील दिमाखदार आणि शानदार लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आजचा हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून संपूर्ण देशासह जगाचं लक्ष लागलं आहे.

Published on: Nov 19, 2023 12:22 PM
IND vs AUS : घरच्या मैदानावर World Cup 2023 चं अंतिम युद्ध जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज
Ashish Shelar : …यावर भारताचं यश आश्वस्त, बीसीसीआयचे खजिनदार म्हणून आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?