Ashish Shelar : …यावर भारताचं यश आश्वस्त, बीसीसीआयचे खजिनदार म्हणून आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
बीसीसीआचे खजिनदार आणि भाजप नेते आशिष शेलार हे अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेलार याची देही याची डोळा हा सामना पाहणार आहे. यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला वर्ल्डकप स्पर्धेतील सामने बघण्याचं भाष्य मिळालं. मी भारतीय संघाला...
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३ : बीसीसीआयचे खजिनदार आणि भाजप नेते आशिष शेलार हे अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेलार याची देही याची डोळा हा सामना पाहणार आहे. यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले, ‘मला वर्ल्डकप स्पर्धेतील सामने बघण्याचं भाष्य मिळालं. मी भारतीय संघाला आजच्या अंतिम सामन्यासाठी चेअरअप करण्यासाठी आलो आहे.’ दरम्यान, तब्बल २० वर्षांनंतर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना आज रंगणार आहे. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विश्वचषक ऑस्ट्रेलिया संघाने ५ वेळा जिंकलेत तर दोनदा भारतीय संघानं विजय मिळवला आहे. ‘भारताचं मनोबल, भारतीय खेळाडूंची आतापर्यंत त्यांनी केलेली कामगिरी, त्यांची उंची आणि त्यांच्यावर असलेले संपूर्ण भारतीयांचे आशीर्वाद यावर भारताचं यश आश्वस्त आहे.’, असे शेलार म्हणाले.