IND vs AUS, World Cup 2023: अहमदाबादला पोहोचताच सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया, आज संध्याकाळी…
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. 1983 आणि 2011 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर भारताने चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ पाच विश्वचषक जिंकल्यानंतर आठव्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत दाखल
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२३ : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. 1983 आणि 2011 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर भारताने चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ पाच विश्वचषक जिंकल्यानंतर आठव्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील या थरारक सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींप्रचंड उत्साह आहे. रविवारी सकाळपासूनच लोक अहमदाबादला दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही काही वेळापूर्वी अहमदाबाद विमानतळावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सचिन तेंडुलकरनेही या सामन्याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. सचिन म्हणाला की, ‘मी इथे माझ्या शुभेच्छा भारतीय संघाला देण्यासाठी आलो आहे. आशा आहे की, आज संध्याकाळी आपण वर्ल्डकप ट्रॉफी नक्की उचलू. प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत होता.’