World Cup 2023 : 20 साल बाद, हिशेब करा साफ! 2003 नंतर यंदा ‘महामुकाबला’
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप २०२३ या अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. हा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याकडे सर्व देशासह जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलंय
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातील भारतीयांचं लक्ष लागले आहे. आजचा सामना रंगण्यापूर्वी २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यातील स्पर्धेत भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात भिडला होते. ऑस्ट्रेलिया संघाने फक्त दोन विकेट गमावत ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. त्याविरोधात भारताचा संघ अवघ्या २३४ धावामध्ये पूर्ण बाद होत १२५ धावांनी भारताला पराभव स्विकारावा लागला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर २००३ च्या सामन्याची परतफेड २०२३ मध्ये भारतीय संघ करेल का?याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. क्रिकेट इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विश्वचषक ऑस्ट्रेलिया संघाने ५ वेळा जिंकलेत. १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०२५ चं विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकलंय. भारत किती वेळा विश्वविजेता झाला? अन् कोणत्या साली? जाणून घ्या…