WITT Global Summit : मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’मुळे भारत विकसित होणार, अभय भुतडा यांना विश्वास

| Updated on: Feb 25, 2024 | 6:18 PM

TV9 नेटवर्कचं ग्लोबल समीट 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 'डिजिटल इंडिया'मुळे भारत विकसित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Follow us on

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : TV9 नेटवर्कचं ग्लोबल समीट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी संबोधित केले. ते म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित करण्यात मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाचे मोठे योगदान असणार आहे. मोदी सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होणार असून सरकारच्या डिजिटल पेमेंट सोल्यूशन्समुळे आता देशातील सामान्य लोकही राष्ट्र उभारणीत आपली भूमिका बजावू शकत असल्याचेही अभय भुतडा यांनी म्हटले. इतकंच नाहीतर पंतप्रधान मोदी सरकारचे समृद्धीचे उद्दिष्ट साध्य करण्यातही मदत होणार आहे. अभय भूतडा हे देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.