MV Lila Norfolk जहाज हायजॅकचा प्रयत्न फसला, भारतीय नौदलाकडून कारवाईचा व्हिडीओ शेअर
एमवी लीला नॉरफॉक हे भारतीय नौदलाचं मालवाहू जहाज हायजॅक करण्याचा डाव समुद्री डाकूंचा होता. मात्र भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यानंतर हायजॅकर्सचा शोध सुरू झाला. मात्र हॅकर्स पळून जाण्यात यशस्वी ठरले.
चेन्नई, ५ जानेवारी, २०२४ : भारतीय नौदलाने एक स्पेशल ऑपरेशन करुन जहाज हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न चांगलाच हाणून पाडला आहे. एमवी लीला नॉरफॉक हे भारतीय नौदलाचं मालवाहू जहाज हायजॅक करण्याचा डाव समुद्री डाकूंचा होता. मात्र भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यानंतर हायजॅकर्सचा शोध सुरू झाला. मात्र हॅकर्स पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण भारतीय नौदलाच्या या धाडसी ऑपरेशन केलं आणि जहाजामधील 21 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 15 भारतीयांचा समावेश आहे. भारतीय नौदलाकडून कारवाईचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. स्पेशल फोर्स ओळख असलेल्या मार्कोस कमांडोंनी ही मोठी कारवाई केली आहे. या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या जवानांनी जहाजातील 21 जणांची सुटका केली. यानंतर या जहाजाची झाडाझडती घेतली मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.