Tokyo Olympics 2021 | मीराबाई चानूने रचला इतिहास,वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं

| Updated on: Jul 24, 2021 | 2:01 PM

टोक्यो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympic) आज दुसराच दिवस असून भारताने पहिलं पदक खिशातही घातलं आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu)  वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिलं आहे.

टोक्यो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympic) आज दुसराच दिवस असून भारताने पहिलं पदक खिशातही घातलं आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu)  वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे.

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

Raigad Landslide | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, ग्रामस्थ भयभीत
CM on Reached Mahad | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडमध्ये दाखल