Paris Olympics मध्ये कुस्तीपटू विनेश फोगटचं मेडलचं स्वप्न भंगलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 08, 2024 | 9:23 AM

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटचं ऑलिम्पिकमधून मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. पॅरिस ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळण्यापूर्वीच विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. सेमी फायनलमध्ये विजय मिळवत विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र काही ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट पॅरिस ऑल्मिक स्पर्धेत अयोग्य घोषित करण्यात आली आहे. या निर्णयाने केवळ विनेश फोगाट हिची निराशा झाली नाहीतर संपूर्ण भारताची निराशा झाली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक सामन्यात बुधवारी अंतिम सामन्यात धडक दिलेल्या विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं. या बातमीने सुवर्ण पदकांची आशा बाळगलेल्या करोडो भारतीयांना धक्का बसला. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक अंतिम सामन्यात धडक दिली होती म्हणजे भारताचं रौप्य पदक निश्चित होते. पण अपात्र घोषित केल्यानं तिचं ऑलिम्पिक मेडेलचं स्वप्न भगलं. पॅरिस ऑलिम्पिक सामन्यात विनेश फोगट ५० किलो वजन कॅटेगरीत खेळत होती. मंगळवारी विनेशने क्युबाच्या कुस्तीपटू विरोधात सेमीफायनल जिंकली. त्यावेळी तिचं वजन ५० किलो होतं. नियमानुसार फायनलच्या आधी विनेशचं वजन करण्यात आलं. त्यावेळी ते १०० ग्रॅमनं जास्त भरलं होतं. याच कारणानं तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलं. बघा यासंदर्भातील विनेश फोगटचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 08, 2024 09:23 AM
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ कुणाची? दादांची की शिंदेंची? NCP च्या जनसन्मान यात्रेआधीच ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब?
मनसे अन् मिटकरींमध्ये वार-पलटवार… शाब्दिक वाद काही मिटेना… घासलेट चोर vs खंडणीचोर