Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘या’ महिला नेत्याची वर्णी?, पहिल्यांदाच होणार महिला अध्यक्ष
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘या’ महिला नेत्याचं नाव पुढे
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आपला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांची नावे चर्चेत आहेत. मात्र अजित पवार (Ajit Pawar) ऐवजी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. सुप्रिया सुळे या आज कर्नाटकातील निपाणी येथे प्रचारासाठी दौऱ्यावर आहे. सुप्रिया सुळे कर्नाटकात प्रचाराला जात असल्याने त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याचे संकेत वर्तवले जात आहे. जर हे संकेत खरे ठरले तर राष्ट्रवादीला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चाही सुरू आहे.