Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल; आज सुनावणी, काय आहे प्रकरण?
VIDEO | प्रसिद्ध आणि चर्चेत राहणारे किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर PCPNDT या कायद्यानुसार गुन्हा दाखल. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी. मात्र इंदुरीकर स्वतः हजर रहाणार?
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या किर्तनातील विनोद आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर PCPNDT या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपत्य प्राप्ती संबंधित इंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मात्र या सुनावणीला स्वतः इंदुरीकर महाराज हजर राहणार का? याकडे आता बघणं महत्त्वाचं राहणार आहे. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र जिल्हा न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती.