कीर्तनकारांनी 5 हजार जादा घेतले तर… इंदोरीकरांचा राजकीय सभांवरून हल्लाबोल

| Updated on: Mar 24, 2024 | 2:55 PM

राजकीय धुराळा उठण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी राजकीय सभांवर जोरदार हल्लाबोल केलाय. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामधील कुंभेज गावात महाराजांचे किर्तन होते. या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी राजकीय सभांवर वक्तव्य केले आहे.

इंदोरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या वक्तव्य आणि किर्तनाच्या अनोख्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. इंदोरीकर महाराज यांनी नुकतंच राजकीय प्रचार सभा आणि कार्यकर्त्यांवर भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात, राजकीय धुराळा उठण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी राजकीय सभांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कीर्तनकारांनी ५ हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते.मात्र राजकीय सभांना ५ कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय? असा थेट सवालच इंदोरीकर महाराज यांनी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामधील कुंभेज गावात महाराजांचे किर्तन होते. या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी राजकीय सभांवर वक्तव्य केले. त्यांनी राजकीय सभा आणि किर्तनाची तुलनाच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. बघा नेमकं काय म्हणाले इंदोरीकर महाराज?

Published on: Mar 24, 2024 02:21 PM
शिरूरच्या जागेवरील तिढा सुटला, आढळराव लोकसभा लढणार; उदयनराजे आणि अडसूळांना अद्याप तिकीट नाही
चंदा घेऊन धंदा करणं भाजपचं काम, काँग्रेसच्या बड्या नेत्याची सडकून टीका