बारसू रिफायनरीबाबत उदय सामंत राज ठाकरे यांची भेट घेणार, काय मांडणार भूमिका?
VIDEO | विकासाच्या सोबत राज ठाकरे, उदय सामंत मनसे अध्यक्षांची भेट घेणार, काय मांडणार नेमकी भूमिका?
मुंबई : बारसूकरांचा प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. यासह हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जायेगी… आम्हाला शहाणपणा शिकवू नका; असा इशाराच संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला. बारसूबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पी भूमिका घेतलेली नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले. अशातच बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले तर आज काही कामाकरता उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याकरता आलो होतो.बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी संदर्भात देखील आमची चर्चा झाली आहे. उदय सामंत हे राज ठाकरे यांची आज भेट घेऊन आपली भूमिका राज ठाकरे यांच्या समोर मांडणार आहेत. राज ठाकरे नेहमी विकासाच्या सोबत राहिले आहेत. महाराष्ट्रात काही चांगलं घडत असेल तर राज ठाकरेंचा त्याला नेहमी पाठिंबा असतो. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी बारसूमध्ये रिफायनरी व्हावं याकरता केंद्र सरकारला एक पत्र लिहलं होतं. ते पत्र देखील उदय सामंत यांनी मला दिलं आहे. आज उदय सामंत राज साहेबांची भेट घेऊन भूमिका मांडतील, असेही त्यांनी म्हटले.