डोंबिवली स्फोट प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश, म्हणाले…
उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट झालेल्या घटनास्थळी दाखल होत उदय सामंत हे त्या कंपनीची पाहणी करणार आहेत. मात्र त्यापूर्वी उदय सामंत यांनी फोनवरून घटलेल्या घटनेसंदर्भात काय दिली प्रतिक्रिया?
उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट झालेल्या घटनास्थळी दाखल होत उदय सामंत हे त्या कंपनीची पाहणी करणार आहेत. मात्र त्यापूर्वी उदय सामंत यांनी फोनवरून घटलेल्या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. फोनवरून प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी घडलेल्या घटनेची अधिकृत माहिती दिली. ‘डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आहे. केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला त्यावेळी जी लोकं त्यात अडकली होती. त्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. अजून किती लोकं आहेत त्यांची माहिती सध्या नाही.’, असे उदय सामंत यांनी सांगितले तर जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. खासदार श्रीकांत शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती देताना उदय सामंत म्हणाले, डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झालेल्या घटनेत जर कोणी नियम पाळले नसतील, दुर्लक्ष कोणाचं झालं असेल आणि त्यातून ही घटना घडली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.