Uday Samant : मुख्यमंत्री शिंदे सोडा, माझी दखल शिवतीर्थावर…, त्या आरोपांवरून उदय सामंत यांनी काय लगावला टोला

| Updated on: Oct 25, 2023 | 1:16 PM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी संजय राऊत यांनी उदय सामंत यांनी शंभर कोटीचा डांबर घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही केला. यावर उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र लुटण्याचं काम हे सरकार करत आहे असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल दसरा मेळाव्यातून सरकारवर निशाणा साधला. तर रत्नागिरी जिल्ह्यातून एक घोटाळा समोर आलाय. उदय सामंत यांनी शंभर कोटीचा डांबर घोटाळा केलाय. डांबर घोटाळा? काय केले? रस्त्याची खोटी कामे दाखवून 100 कोटी लुटले, असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या आरोपांवर उदय सामंत यांनी भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सामंत म्हणाले, ‘मी त्याच्यातील डांबर तोंडाला काळं फासायला ठेवलंय. मी अशा फुटकळ आरोपांना किंमत देत नाही, भीकही घालत नाही. माझ्या लेखी अशा आरोपांनी किमंत शून्य आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा’, असे म्हणून चॅलेंजही दिले आहे. पुढे ते असेही म्हणाले, माझी दखल शिवतीर्थावर घेतली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडा मलाच किती लोकं घाबरताय बघा, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Published on: Oct 25, 2023 01:11 PM
Sudhir Munganitwar : उद्धव ठाकरे यांचं हे वैचारिक आजारपण, सुधीर मुनगंटीवार यांचा ‘त्या’ टीकेवर घणाघात
Sanjay Raut : भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी घेरलं