पावसामुळे झाडाखाली थांबले अन् वीज कोसळली, जीव जात असताना ‘राजा’नं वाचवले बेशुद्ध मालकाचे प्राण

| Updated on: Aug 06, 2024 | 12:41 PM

आपल्या लाडक्या बैलाला गोंजारणारे हे आहेत बिभीषण कदम... मृत्यूच्या दाढेतून याच बैलाने बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं. 5 जून रोजी बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसात एका झाडाखाली पती-पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यात बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीरित्या जखमी झाल्या. अर्धा तास...

बीडच्या लोणी घाट येथे राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. दरम्यान या घटनेची राज्यभरात चर्चा आहे. आपल्या लाडक्या बैलाला गोंजारणारे हे आहेत बिभीषण कदम… मृत्यूच्या दाढेतून याच बैलाने बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं. 5 जून रोजी बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसात एका झाडाखाली पती-पत्नी उभे असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यात बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी गंभीरित्या जखमी झाल्या. अर्धा तास हे दोघेही पती-पत्नी बेशुद्ध पडले होते. जेव्हा बिभीषण आणि त्यांच्या पत्नीला शुद्ध आली ते कसेबसे बैलगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी बाजूला असलेला प्रधान आणि राजा ( दोन बैलांची नावे) मालक अडचणीत असल्याचे पाहून दोघेही धावून आले. बिभीषण यांनी “‘चल आता घरी सोड” असे म्हणताच लाडका राजाने गुडघ्यावर बसून जू स्वतःच्या मानेवर घेतला आणि प्रधानच्य़ा साथीने तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी मालकाला सुखरूप नेऊन सोडलं. तिथं गेल्यावर लाडक्या राजाने जोरात हंबरडा फोडला. यावेळी बिभीषण यांचा मुलगा आणि सून धावून आले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांचा प्राण वाचला… मुक्या जनावरांच्या या सतर्कतेमुळे या दोन्ही पती-पत्नीचा जीव वाचला आहे.

Published on: Aug 06, 2024 12:41 PM
VIDEO : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळींची अशी अवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क, चालताही येईना…
मनोज जरांगे पाटील मराठवाड्यानंतर उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रात, कसा असेल दौरा?