सोलापुरात ३० दिवसांत २ पालकमंत्र्यांविरोधात आंदोलन, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; काय कारण?
tv9 Marathi Special Report | गेल्या ३० दिवसांमध्ये सोलापुरातील पालकमंत्र्यांविरोधात झालेली आंदोलनं चर्चेत. कंत्राटी भरतीविरोधात सोलापूरचे नवे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाई फेक. पिंपरीनंतर सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक..
मुंबई, १७ ऑक्टोबर, २०२३ | गेल्या ३० दिवसांमध्ये सोलापुरातील पालकमंत्र्यांविरोधात झालेली आंदोलनं चांगलीच चर्चेत आहे. कंत्राटी भरतीविरोधात सोलापूरचे नवे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. पिंपरीनंतर सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. सरकारने वेगवेगळ्या खात्यांमध्ये सुरू केलेली कंत्राटी भरती बंद करा, यासाठी भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्यानं ही शाई फेक केली आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा हा पहिलाच सोलापूर दौरा होता. याआधी राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री होते. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात विखे पाटलांवर धनगर आरक्षणाबाबत भंडारा टाकला होता. त्यानंतर आता सोलापूरचे नव्यानं पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली गेली. सरकारी नोकऱ्यांवर कंत्राटी भरतीला विरोधकांसोबत तरुणांचाही रोष दिसतोय. मात्र दुसरीकडे सरकारकडून कंत्राटी भरतीचा धडाका सुरुच आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट