अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद, गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याविरोधात स्थानिक भाजपने घोषणाबाजी केलीये. इतकंच नाहीतर हिंगोलीची उमेदवारी भाजपला मिळावी, अशी मागणीही केली. या सगळ्याप्रकारानंतर हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत.
हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याविरोधात स्थानिक भाजपने घोषणाबाजी केलीये. इतकंच नाहीतर हिंगोलीची उमेदवारी भाजपला मिळावी, अशी मागणीही केली. या सगळ्याप्रकारानंतर हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. दुसरीकडे धुळ्यात राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आलाय. जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली. रावेरमध्ये भाजप आपल्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केलाय. धुळ्यातून राष्ट्रवादीतील अतंर्गत संघर्षच समोर आलाय. आढावा बैठकीच्या वेळी स्थानिक नेते इतरांना कायम डावलत असल्याची तक्रार अनिल पाटील यांच्याकडे करण्यात आलीये. यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजप नारायण राणेंना उभं करू शकतं. मात्र ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. बघा नेमकं काय म्हणाले शिरसाट?