Amravati | अमरावती शहरातील इंटरनेट सुविधा पुन्हा सुरु, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

| Updated on: Nov 19, 2021 | 5:06 PM

अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत आज शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. 

त्रिपुरातील कथित घटनेनंतर महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्येही तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत आज शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहनं आणि दुकानांचंही नुकसान झालं. त्यानंतर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलीय. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.

Vikram Gokhale UnCut | मला 2014 लाच खरं स्वातंत्र मिळालं, मी या मतावर ठाम
Uddhav Thackeray | सीएमच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा, H.N रिलायन्स रुग्णालयाचा खुलासा