मंत्रालयातीलच इंटरनेट सेवा कालपासून ठप्प, सर्व कामं खोळंबली अन्…

| Updated on: Apr 19, 2023 | 11:49 AM

VIDEO | मुंबई मंत्रालयातील इंटरनेट सेवा ठप्प, मंत्रालयातील प्रवेश पासशिवाय इतर विभागातील कामकाजाला मोठा फटका

मुंबई : मंत्रालयातील सर्वच कामं डिजिटल पद्धतीने करण्यावर भर देण्यात आली असताना मंत्रालयातील इंटरनेट सेवा कालपासून ठप्प असल्याचे समोर आले आहे. ही इंटरनेट सेवा कोलमडल्याने मंत्रालयातील प्रवेशासाठी देण्यात येणारी डिजिटल पास सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात अनेकांची कामं रखडली असून त्यांचा खोळंबा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ऑनलाईन मध्यवर्ती टपाल केंद्राच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला इंटरनेटचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. काल दुपारी ३ वाजेपासून इंटरनेट सेवा ठप्प असून पाससह इतर डिजिटल पद्धतीने होत असलेल्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद पडल्यानंतर मंत्रालयात देण्यात येणाऱ्या डिजिटल पास ऐवजी आता हस्तलिखित पास दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. कालपासून बंद असेलेल्या इंटरनेट सेवेमुळे मंत्रालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Published on: Apr 19, 2023 11:48 AM
बंडाच्या चर्चांनंतर राष्ट्रवादीचे हे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या भेटीला; काय कारण?
फडणवीस म्हणालेले, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग! मग पहाटे का केलं किसिंग?- अभिजित बिचुकले