PM Narendra Modi Interview : आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच आम्ही अनेक विजय देखील मिळवले आहेत. त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. विजय देखील मिळवले आहेत, त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.