बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार! मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला जाणार, ट्वीट करत म्हणाले…
महाराष्ट्रातून एकूण ८०० हून अधिकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात ५३४ विशेष निमंत्रित असून उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अयोध्येतील सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबई, ८ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून एकूण ८०० हून अधिकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात ५३४ विशेष निमंत्रित असून उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अयोध्येतील सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार.. अयोध्येला जाणार ! असं कॅप्शन देत शिंदेंनी एक फोटोही ट्वीट केला आहे. तर अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.