शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार? बीकेसीतील एमएमआरडीएम मैदानासाठी शिंदे गटाकडून अर्ज- सूत्र
शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत पालिकेच्या प्रशासकांकडून नेमकी परवानगी कुणाला दिली जाते, याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.
मुंबई : गणेशोत्सव अजून संपला नसला, तरी राज्यात दसरा मेळाव्यावरुन राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) तापू लागलं आहे. शिवसेनेचा दसरा (Shiv sena Dussehra Melawa) मेळावा कुठे होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. अशातच शिंदे गटानेही आपण दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नेमकं शिवाजी पार्क कुणाला मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर घेतला जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत पालिकेच्या प्रशासकांकडून नेमकी परवानगी कुणाला दिली जाते, याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. पण शिंदे गटाला जर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही, तर त्यांचा दसरा मेळावा बीकेसी येथील एममएमआरडीए मैदानावर घेतला जाण्याचीही शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवलीय.