एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री भाजपला मान्य? अजित पवार यांचा खोचक सवाल
VIDEO | राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपची खिल्ली उडवली आहे
मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपची खिल्ली उडवली आहे. इतकेच नाहीतर यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक 26 टक्के कौल दाखवण्यात आला आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून 23 टक्के कौल दाखवण्यात आला आहे. यावरूनच अजित पवार यांनी भाजपला कात्रीत पकडलं आहे. “गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण ऐकलं होतं. केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र, अशी घोषणा ऐकली होती. पण आता जाहिरातीतून नवीन घोषणा करण्यात आली आहे. केंद्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही ही घोषणा द्यावी लागेल. हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? याचा खुलासा करावा”, अशी मागणी अजित पवारांनी केली.