Special Report | नारायण राणेंना जनआशीर्वाद यात्रेतून काय मिळवलं?

| Updated on: Aug 24, 2021 | 11:55 PM

भारतीय जनता पक्षाने 19 ऑगस्टपासून जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात केली. याची सुरुवात मुंबईतून झाली. या यात्रेच्या सुरुवातीपासूनच नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

भारतीय जनता पक्षाने 19 ऑगस्टपासून जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात केली. याची सुरुवात मुंबईतून झाली. या यात्रेच्या सुरुवातीपासूनच नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यानंतर राणेंनी मुंबईत शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. त्या दिवसापासून शिवसैनिक विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर राणेंची यात्रा कोकणात दाखल झाली. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. त्यामुळे आज त्यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केलं.

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर
Breaking | नारायण राणेंच्या अटकेसंदर्भात बुधवारी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक