Special Report | भारतात कोरोनाची तिसरी लाट?
गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताप्रमाणे युरोपातील परिस्थितीदेखील बिघडत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युरोपियन देशांमध्ये कोरोना लसीकरणाच्या संथ गतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशी भीतीही व्यक्त केली आहे की, या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने युरोपियन देशांमध्ये कहर केला आहे. युरोपमध्ये लसीकरणाच्या गतीमध्येही मंदी आली आहे. तथापि, आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना गरीब देशांमध्ये लसीकरणाबद्दल चिंतेत होती. हेच कारण आहे की जागतिक आरोग्य संघटनेने काही युरोपियन देशांच्या वतीने बूस्टर डोस सुरु करण्यास अनिच्छा व्यक्त केली होती.
महाराष्ट्रातील परिस्थितीदेखील बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे. राज्याच्या राजधानीत सध्या 3021 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या 7 लाख 42 हजार 763 वर पोहोचली आहे. तर, मुंबईत 15 हजार 968 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत.