Ramdas Kadam : सारखा बोलतो, मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

| Updated on: Sep 19, 2022 | 8:15 AM

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे की काय? असं म्हणत कदमांनी जहरी टीका केलीय. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले असंही रामदास कदम म्हणालेत.

रत्नागिरी : शिंदे गटातले (Ekanth Shinde Gorup) नेते आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर जहरी टीका केलीय. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत असं बोलताना रामदास कदमांनी (Ramdas Kadam) उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलाय. उद्धव ठाकरे हे आपण बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगतात. त्यामुळं बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) संशय आहे की काय? असं म्हणत कदमांनी जहरी टीका केली. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले असंही रामदास कदम म्हणालेत. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम बोलत होते.

Published on: Sep 19, 2022 08:15 AM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 September 2022
देशात ‘लम्पीचा’ कहर; देशभरात 82 हजार जनावरांचा मृत्यू; राज्यातील मृत्यूचा आकडाही मोठा