पुढील 2 तासांमध्ये इस्त्रो ऐतिहासिक पाऊल टाकणार, किती वाजता Chandrayaan उतरणार चंद्रावर?
VIDEO | भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचा आज अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 चं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आज उरणार चंद्रयान 3 च्या लँडिंगसाठी उरले केवळ २ तास, पुढील 2 तासांमध्ये इस्त्रो टाकणार ऐतिहासिक पाऊल
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचा आज अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 चं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आज उरणार आहे. त्यासाठी सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परिस्थिती अनुकूल असेल तर चांद्रयान आजच उतरवलं जाणार आहे. त्यामुळे भारताच्या मून मिशनसाठीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज भारताचं चांद्रयान-3 हे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे चंद्रयान 3 च्या लँडिंगसाठी अवघे 2 तास उरले असून पुढील 2 तासांमध्ये इस्त्रो ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे. याचवेळी भारताच्या मून मिशनला शेवटच्या 17 मिनिटात प्रवेश करावा लागेल. चांद्रयान-3 च्या लँडिंगची ही वेळ असणार आहे. लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं पाऊल ठेवणार आहे. तर लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरमधून रँपच्या माध्यमातून 6 पायांचा प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. इसरोची कमांड मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर तो चालू लागेल. यासर्व ऐतिहासिक प्रक्रियेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.