नाशिक म्हणतंय आमी बी कमी न्हाय! पावसाची तुफान बॅटिंग नाशकातही…
इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. भावली, तळेगाव, खालची पेठ यासह घोटीमध्ये पाऊस झालेला आहे. परिसरात छान गारवा पसरलेला आहे.
नाशिक: मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे बरीच ठिकाणं बंद करण्यात आलेली आहेत. रस्त्यांवर गुडघ्याइतकं पाणी साचलेलं आहे, रस्ते बंद केलेले आहेत. अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस चालू आहे. मुंबईनंतर आता नाशकात (Nashik) सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग (Nashik Rains) चालू आहे. खरं तर प्रचंड उकाडा होता त्यामुळे नाशकात नागरिक उकाड्याने त्रस्त होते, आता मात्र पाऊस झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. इगतपुरीमध्ये (Igatpuri) जोरदार पाऊस झालेला आहे. भावली, तळेगाव, खालची पेठ यासह घोटीमध्ये पाऊस झालेला आहे. परिसरात छान गारवा पसरलेला आहे.
Published on: Jul 01, 2022 11:06 AM