वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं- शरद पवार

| Updated on: Sep 15, 2022 | 4:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. "वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं" असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.

वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्यात मोदींनी मदत केली तर स्वागतच! पण आता गुजरातला गेलेला हा प्रकल्प परत येणं अशक्य असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महराष्ट्रात ऐवजी आता गुजरातमध्ये होणार आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप- प्रत्यारोपाचं राजाकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. “वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.

 

 

Published on: Sep 15, 2022 04:08 PM
ठाकरे सरकारवर खापर फोडणं अयोग्य- शरद पवार
वेदांता प्रकल्पावरून शरद पवारांचा मोदींना टोला