मुख्यमंत्रीपदावर कुणाला संधी द्यायची, हा पूर्णपणे सेनेचा प्रश्न : शरद पवार
एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार आज संध्याकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सरकारमधील मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं पवारांनी सांगितलं. त्याचप्रमाणे शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्त्व बदलण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.
Published on: Jun 21, 2022 03:28 PM