कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं- दिलीप लांडे
"आज शेतकऱ्याचा मुलगा, सच्चा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, यापेक्षा दुसरा आनंद कुठला नाही. कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं," अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांनी दिली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पदभार स्वीकारला. त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेचा विकास, जनतेची सेवा घडो अशी प्रार्थना मी पांडुरंगाकडे करतो. सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद मिळावं, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते आज साकार झालं. आज शेतकऱ्याचा मुलगा, सच्चा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, यापेक्षा दुसरा आनंद कुठला नाही. कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं,” अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांनी दिली.