ठाकरे सरकारवर खापर फोडणं अयोग्य- शरद पवार

| Updated on: Sep 15, 2022 | 3:55 PM

राज्यातील लाखो लोकांना रोजगार देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महराष्ट्रात ऐवजी आता गुजरातमध्ये होणार आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आरोप- प्रत्यारोपाचं राजाकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान आता यामध्ये संभाजी ब्रिगेडनं देखील उडी घेतली आहे. राज्यातील लाखो लोकांना रोजगार देणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आज संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.

 

 

Published on: Sep 15, 2022 03:55 PM
Video | लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहाबाबत विधेयक? अनिल बोंडेनी सविस्तर सांगितलं…
वेदांता प्रकल्पावरून शरद पवारांचा मोदींना टोला