बापरे…खतरनाक! …अन् लालपरी थेट घुसली सुतगिरणीमध्ये, नेमकं काय घडलं काही कळंनाच
भरधाव वेगात असलेली बस ही सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या बसमध्ये जवळपास 60 ते 65 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.
जळगाव, २३ डिसेंबर २०२३ : चोपड्याहून नाशिकला निघालेली चोपडा आगाराची बस भीषण अपघातातून बालबाल बचावली. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्डयाचा चालकाला अंदाज न आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले, यातच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगार्यामुळे ते वाहन थांबवू शकले नाही. परिणामी भरधाव वेगात असलेली बस ही सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या बसमध्ये जवळपास 60 ते 65 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. तर सुदैवाने सगळे सुखरूप असून बचावले आहेत. एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने मोठी हानी होता होता टळली आहे. मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यावरील मोठे खड्डे बुजावा अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.
Published on: Dec 23, 2023 02:35 PM