Jalgaon- पोलीस गाडीच्या अपघाताचा थरार CCTV त कैद

| Updated on: Mar 30, 2022 | 9:48 AM

सायकलस्वार तरुणाला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनने (Police Van) कारला धडक दिली. जळगावमध्ये भुसावळ रोडवर हा विचित्र अपघात (Jalgaon Accident) झाला. ऑटो रिक्षा चालकाच्या मूर्खपणामुळे हा भीषण अपघात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहेत.

सायकलस्वार तरुणाला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनने (Police Van) कारला धडक दिली. जळगावमध्ये भुसावळ रोडवर हा विचित्र अपघात (Jalgaon Accident) झाला. ऑटो रिक्षा चालकाच्या मूर्खपणामुळे हा भीषण अपघात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहेत. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. प्रवासी उतरवण्यासाठी ऑटोवाल्याने रहदारीच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला. दाराची धडक लागल्यामुळे रस्त्यावर मागून येत असलेला सायकलस्वार खाली पडला. तर भर रस्त्यात पडलेल्या सायकलस्वाराला वाचवताना पोलीस वाहन समोरच्या व्हॅनवर जाऊन आदळले आणि हा विचित्र अपघात झाला.

भुसावळ रोडवरील खेडी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या वाहनाने व्हॅनला धडक दिली. यात पाच जण जखमी झाले आहेत. जळगावातून मुक्ताईनगरला आरसीपीचे प्लाटून घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला.

10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 29 March 2022
महाराष्ट्रात (Maharashtra) पुढचे चार दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) कायम