काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून साकारली बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 13, 2024 | 12:00 PM

जय गणेश मित्र मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांनीच केळीच्या खोडाच्या पावडर पासून सात फुटांची बाप्पाची मूर्ती बनवली आहे. केळीच्या खोडाच्या पावडर पासून बाप्पाची मूर्ती बनवण्याचा हा देशातला पहिलाच उपक्रम असल्याचा जय गणेश मित्र मंडळाने दावा केला आहे. केळीच्या खोडाच्या पावडर पासून बनवलेली मूर्ती पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी होत आहे.

जळगावातील जय गणेश मित्र मंडळाने केळीच्या खोडाच्या पावडर पासून बाप्पाची मूर्ती बनवून तिची स्थापना केली आहे. पर्यावरण पूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी जय गणेश मित्र मंडळाने पुढाकार घेऊन केळीच्या खोडाच्या पावडर पासून 100 टक्के पर्यावरण पूरक मूर्ती बनवली आहे. केवळ शंभर टक्के पर्यावरण पूरक मूर्तीच बनवली नाही तर तिची स्थापना सुद्धा केली आहे. वजनाला हलकी आणि दिसायला सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती नागरिकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ही 100% पर्यावरण पूरक असलेली मूर्ती बारा तासात पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जात असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. तर मूर्ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर मूर्तीतील घटक पाण्यातील माशांना खाद्य स्वरूपात मिळत असल्याने जलप्रदूषणही होत नसल्याचे जय गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Published on: Sep 13, 2024 12:00 PM
MSRTC Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
‘संजय राऊत भैसाटलेल्या मनस्थितीचे, त्यांच्या बुद्धीला लकवा मारलाय’, भाजपच्या बड्या नेत्याचा पलटवार