Eknath Khadse : टायगर अभी जिंदा है… नाथाभाऊंच्या ‘त्या’ जाहिरातीने खान्देशात चर्चांना उधाण

| Updated on: Jun 06, 2024 | 12:22 PM

भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डिवचण्यात आल्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जळगावात रंगली आहे

जळगावच्या वर्तमानपत्रात आता एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर अभी जिंदा है अशा आशयाची एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातील एका जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहीलेली ही जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . एवढंच नव्हे तर ‘ एहसास से मजबूर ना समझो गुलशन से बहुत दूर ना समझो मुझको, मै आज भी इतिहास बदल सकता हू इतना भी कमजोर ना समजो मुझको’ असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. जळगावत रक्षा खडसे यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर सर्वच समीकरण बदलून गेली आहेत. तर भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डिवचण्यात आल्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जळगावात रंगली आहे. यामुळे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा वाक् युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 06, 2024 12:22 PM
Devendra Fadnavis : ‘पराभवाची जबाबादारी माझी, मला मोकळं करा’, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर कोणती जबाबदारी?
नाटक न करता राजीनामा द्यावा आणि…, देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं डिवचलं