पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचं काल लोकार्पण आणि आज तोडफोड, नेमकं काय घडलं?
जळगावात काल लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलाच्या कोनशिलेची आज तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तर पिंप्राळा परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन यांचं नाव नसल्याने तोडफोड
जळगाव, १८ डिसेंबर २०२३ : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. हा रेल्वे उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर शासनाकडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले त्यामुळे शासनाचे आम्ही खूप आभार व्यक्त करतो या शब्दात जळगावकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मात्र जळगावात काल लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलाच्या कोनशिलेची आज तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तर पिंप्राळा परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन यांचं नाव नसल्याने तोडफोड झाल्याची चर्चा जळगावात होतेय. या कोनशिलेची तोडफोड अज्ञातांकडून करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Published on: Dec 18, 2023 10:41 PM