Jalgaon | जळगावमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं तीन मजली इमारत कोसळली, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 21, 2021 | 12:47 PM

आता बातमी जळगावमधून आहे. जळगावातील पाचोऱ्यातील तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आता बातमी जळगावमधून आहे. जळगावातील पाचोऱ्यातील तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनानं खबरदारी घेत या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढलं आहे. दोन दिवसांपूर्वी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून इमारात मोकळी करण्यात आल्यानं कोणतीही जीवित हाणी घडली नाही. इमारत कोसळतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा धोकादायक इमाराती कोसळण्याच्या घटना घडत असतात. प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सूचना आणि इशारा दिला जातो. मात्र, अनेकदा नागरिक त्याच परिस्थितीत  राहत असतात. मात्र, जळगावातील प्रशासनानं सतर्कता बाळगत इमारत मोकळी केल्यानं या घटनेत जीवितहानी झालेली आहे.

Buldana | बुलडाण्यात विहिरीत आढळलेला अजगर, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी काढला बाहेर
श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली