Manoj Jarange Patil सकाळी ११ वाजता उपोषण सोडणार? पण मराठा आरक्षणाबाबत ‘त्या’ मागणीवर ठाम

| Updated on: Sep 07, 2023 | 8:04 AM

VIDEO | 'सरकारने दिलेल्या आश्वासनांमधील एकही शब्द इकडे-तिकडे नको', मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत पुढची भूमिका काय? आज सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील उपोषणाबद्दल कोणता निर्णय घेणार?

जालना, ७ सप्टेंबर, २०२३ | मनोज जरांगे पाटील हे सहकाऱ्यांशी चर्चा करून आज सकाळी ११ वाजता उपोषणाबाबत निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी असेही म्हटले की, सरकारनं दिलेल्या आश्वासनांमधला एक शब्दही इकडे तिकडे नको. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा विचार करत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन जुन्या शैक्षणिक आणि महसुलीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर निवृत्त न्यायाधीशाची समिती याबाबत एक महिन्यात जुन्या शैक्षणिक आणि महसुलाच्या नोंदीबाबत तपासणी करून अहवाल सादर करून ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Published on: Sep 07, 2023 08:04 AM
Rajan Vichare यांनी ठाण्यातील टेंभीनाक्याच्या दहीहंडीविषयी केलं आक्षेपार्ह वक्तव्य! ‘गुन्हा दाखल करा’, कुणाची मागणी?
Pankaja Munde यांचा विद्यार्थ्यीनींना सवाल; म्हणाल्या, ‘तुम्हाला काय हवंय?’ विद्यार्थी थेट म्हणाले…