जिगरबाज शेतकऱ्यानं फुलवलं ‘जांभूळ वन’, बघा आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल

| Updated on: Apr 17, 2023 | 10:31 AM

VIDEO | नांदेड जिल्ह्यात लोहगांव इथल्या रमेश शेटकर या शेतकऱ्यांनं फुलवली जांभूळ फळांची बाग, बघा कसा केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नांदेड : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने आणि गारपीटने शेतकरी हवालदिल झाला असून हाता-तोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरवल्याने बळीराजा चिंतातूर आहे. अशातच एका जिगरबाज शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करून आपलं माळरान फुलवल्याचं समोर आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लोहगांव इथल्या रमेश शेटकर या शेतकऱ्यांने जांभूळ फळांची बाग फुलवली आहे, पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्याने ‘जांभूळ वन’ फुलवलंय. अडीच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या जांभळाच्या झाडाला आता मोठी फल धारणा झाली असून त्यातून लाखोंचे उत्पन होईल अशी आशा शेतकऱ्याला आहे.

Published on: Apr 17, 2023 10:26 AM
देशभरात एक प्रकारचं अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातयं; एकनाथ खडसेंचा घणाघात
‘या’ प्रकरणाची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची सरकारकडे मागणी